अधिनियमाची पार्श्वभूमी

भारतामध्ये सर्वप्रथम तत्कालीन Bombay State मध्ये सन 1915 मध्ये नगररचना कायदा Bombay Town Planning Act, 1915 अस्तित्वात आला. त्यावेळी मुंबई, पुणे, ठाणे या भागाकरिता पाणी, रस्ते, वीज इत्यादी सार्वजनिक सुविधा पुरविणे गरजेचे वाटल्यामुळे हा कायदा करण्यात आला आणि त्यातील तरतुदीनुसार अशा पद्धतीने शहराच्या एखाद्या भागाचा विकास करता येणे शक्य् झाले. परंतु या कायद्यांतर्गत विकास करणे ही बाब त्यावेळी बंधनकारक नसून ऐच्छिक होती. परंतु स्वातंत्र्य्प्राप्तीनंतर देशात औद्योगिक क्रांतीचे वारे वाहू लागले व त्या अनुषंगाने नवनवीन शहरे वसायला सुरुवात झाली. देशात पंचवार्षिक योजनांद्वारे विकास सुरु झाला आणि त्या अनुषंगाने नवीन शहरांचादेखील नियोजनबद्ध विकास व्हावा अशी संकल्पना पुढे आली. त्यामुळे सन 1954 मध्ये शहरासाठी विकास योजना तयार करण्याच्या तरतुदींचा अधिनियमात समावेश करण्यात आला आणि या तरतुदीनुसार पत्येक नियोजन प्राधिकरणाला नगरपरिषदांना/महानगरपालिकांना त्यांच्या अधिकारक्षेत्रासाठी विकास योजना तयार करणे या कायद्यान्वये बंधनकारक करण्यात आले.

परंतु कालांतराने शहराच्या हद्दीबाहेरदेखील मोठ्या पमाणात विकास सुरु झाला आणि अशा पद्धतीने हद्दीबाहेर होणाऱ्या विकासावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणताही कायदा नसल्यामुळे या परिसरांचा अनियंत्रित विकास होण्यास सुरवात झाली. यावर उपाय म्ह्णून नागरी व ग्रामीण भागाचा एकत्रित विकास व्हावा अशी संकल्पना पुढे आली. सन 1960 मध्ये महाराष्ट्र राज्य् अस्तित्वात आले. सन 1966 मध्ये प्रादेशिक योजनेच्या तरतुदींचा तसेच नवीन शहरांबाबतच्या तरतुदींचा समावेश अधिनियमात करण्यात आला व हाच सन 1966 चा महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, 1966 म्ह्णून सद्य:स्थितीत अमलात आहे.

सन 1914 ते 1962 या कालावधीत या विभागाचे नामाभिधान कन्सल्टिंग सर्व्हेअर टू गव्हर्नमेंट असे होते. सन 1962 पासून नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय अस्त्विात आले असून, संचालनालयाचे मुख्य् कार्यालय मध्यवर्ती इमारत, पुणे येथे आहे.

Consulting Surveyor to Government
Sr. No. Name Period
From To
1 Shri. A.E. Mirams 30-01-1914 31-04-1930
2 Shri. T.H.G. Stamper 01-06-1930 21-07-1938
3 Shri. G.B. Soparkar 22-07-1938 07-06-1943
4 Shri. H. Khan 08-06-1943 30-06-1949
5 Shri. G.J. Desai 01-07-1949 30-06-1952
6 Shri.V.K. Bakre 01-07-1952 05-07-1962
7 Shri. B.T. Talim 6-07-1962 09-11-1962
Director of Town Planning
Sr. No. Name Period
From To
1 Shri. B.T. Talim 10-11-1962 14-05-1972
2 Shri. J.G. Keskar 15-05-1972 31-03-1985
3 Shri. P.G.Sardesai 1-04-1985 30-11-1986
4 Shri. P.T.Hardikar 1-12-1986 31-12-1988
5 Shri. P.G. Borvankar 1-01-1989 31-05-1990
6 Shri.G.L. Madame 1-06-1990 31-07-1994
7 Shri. A.R. Patharkar 1-08-1994 31-05-2002
8 Shri. V.N. Kinhikar 1-06-2002 30-11-2003
9 Shri. V.W. Deshpande 1-12-2003 30-01-2004
10 Shri. P.V. Deshmukh 01-02-2004 31-10-2004
11 Shri. S.D. Landge 01-11-2004 20-06-2006
12 Shri. K.S. Akode, I/c 21-06-2006 03-08-2006
13 Shri. R.A. Kop, I/c 04-08-2006 04-01-2008
14 Shri. S.D. Landge 05-01-2008 04-06-2012
15 Shri. K.S. Akode 05-06-2012 20-05-2015
16 Shri. R.A. Kop 21-05-2015 30-04-2016
17 Shri. N.R. Shende 30-04-2016 till today