नगर रचना योजना

नागरी क्षेत्रासाठी म्हणजेच महानगरपालिका/नगरपरिषदा/नगर पंचायती अशा स्थानिक स्वराज्य् संस्थांच्या कार्यक्षेत्रामध्ये अंतर्भूत क्षेत्रासाठी मंजूर अंतिम विकास योजना क्षेत्रामध्ये महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, 1966 च्या कलम 59 ते 91 मधील तरतुदींनुसार विकास योजना अंमलबजावणीसाठी सविस्त्र सूक्ष्म नियोजन (micro-level planning) म्हणजे Land Pooling and Redistribution या पद्धतीने योजना तयार करण्याची तरतूद असून, या योजनेला शासनाच्या नगर विकास विभागाकडून मान्यता देण्यात येते.

विकास योजना प्रस्तांवाची अंमलबजावणी करणे हा नगररचना योजना तयार करण्याचा मुख्य् उद्देश असतो. या विभागातर्फे काही मूळ नगररचना योजना तयार करण्यात आल्या असून, काहींचे काम प्रगतिपथावर आहे. नगररचना योजनेतील प्रस्तावांमुळे लाभ पोचणाऱ्या भूखंडांवर नगरपरिषद सुधारणा भार आकारु शकते व अशा प्रकारे योजनांचा खर्च वसूल करु शकते. नगररचना योजना हे विकास योजना अंमलबजावणीचे प्रभावी साधन असल्याचे सिद्ध झाले आहे. नगररचना योजनांची अंमलबजावणी न होण्याचे मुख्य् कारण असे की त्या तयार करण्यास लागणारा दीर्घ कालावधी. यासाठी अधिनियमातील नगररचना योजना तरतुदींमध्ये या संचालनालयाने आमूलाग बदल सुचविला असून, सदर बदल विधिमंडळातदेखील मंजूर झालेला आहे.

निवडा

विभाग *
जिल्हा / शाखा कार्यालय*
नगर रचना योजना*