प्रादेशिक योजना
योजना पाहण्यासाठी, संबंधित जिल्ह्यावर क्लिक करा
राज्यातील जिल्ह्यांच्या सर्वसमावेशक विकासासाठी, महानगरपालिका/ नगरपालिका क्षेत्राबाहेर होणाऱ्या अनियंत्रित व अनिर्बंधित वाढीचे सुनियेाजन तसेच नागरी व ग्रामीण क्षेत्रातील विकासाचे संतुलन राखण्यासाठी, तद्वतच ग्रामीण क्षेत्राच्या उन्नतीकरिता प्रस्तावित जमीन वापर व सार्वजनिक सुविधा दर्शविणाऱ्या प्रादेशिक योजना तयार करण्याची तरतूद असून महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, 1966 च्या कलम 3 ते 20 मधील तरतुदींनुसार, प्रादेशिक योजना तयार केल्या जातात.
प्रादेशिक योजना तयार करण्यासाठी राज्य् शासन प्रादेशिक नियोजन मंडळाची स्थापना करते. महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. राज्यातील या सर्व जिल्ह्यांमध्ये प्रादेशिक योजना मंजूर आहेत. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून संवेदनक्षम परिसर सुरक्षिततेसाठी काही प्रदेशांसाठी प्रादेशिक योजना तयार करण्यात आलेल्या आहेत.(महाबळेश्वर-पाचगणी प्रदेश,डहाणू प्रदेश)
प्रादेशिक योजनेची सामग्री
- वेगवेगळ्या वापरासाठी जमिनीचे वाटप
- खुल्या जमिनी, उदयाने, प्राणीसंग्रहालये, अभयारण्ये,दुग्धशाला इ. वापरांसाठी जमिनीचे आरक्षण करणे.
- पाणीपुरवठा, मलनित्सारण, घनकचरा, वीज इ. सुविधांसाठी तरतूदी करणे.
- नविन नगरासाठी स्थळनिश्चिती करणे.
- औद्योगिक वसाहती, म.औ.वि.म. यांचे क्षेत्र.
- पर्यटन विकास प्रकल्प
- वाहतूक आणि दळणवळण
- लष्करी आणि संरक्षण क्षेत्रे
- सिंचन प्रकल्प
- विकास नियंत्रण
- अंमलबजावणी धोरणे
| क्रमांक | विकास योजनेचे नाव | स्थिती | अधिसूचना क्रमांक | नकाशा |
|---|---|---|---|---|
| 1 | Regional Plan of Ahilyanagar | मूळ / १५ (१) | ||
| 2 | Regional Plan of SHRIRAMPUR BRANCH | मूळ / १५ (१) |
|
Chat Bot



आज वापरकर्ते : 553
एकूण वापरकर्ते : 222565
आजचे दृश्य : 1462
एकूण दृश्ये : 580207