विभागाची उद्दिष्टे

Active forum topics

     नगर रचना संचालनालयास खालील कार्ये व कर्तव्ये पार पाडावी लागतात.
• प्रादेशिक योजना तयार करणे (प्रादेशिक नियोजन मंडळामार्फत)
• नगरपरिषदा व आवश्यक तेथे बिगरनगरपरिषदांच्या विकास योजना तयार करणे.
• विकास योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच क्षेत्रांच्या सुनियोजित विकासासाठी नगररचना योजना तयार करणे.
• प्रादेशिक योजना, विकास योजना, नगर रचना योजना, एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्प मंजूर करणेसंदर्भात व अधिनियमातील तरतुदींच्या अनुषंगाने प्राप्त प्रस्तावांवर तसेच विविध धोरणात्मक, वैधानिक व तांत्रिक बाबींवर शासनास सल्ला देणे.


     वरील कामांव्यतिरिक्त् या विभागामार्फत नगर नियोजनाशी संबंधित खालील कामे करण्यात येतात.

• परिवहनविषयक नकाशे, शहराच्या वाहतूक व परिवहनविषयक समस्यांनुसार वाहतूक व्यवस्थापन नकाशे तयार करणे.
• शासकीय जमिनींचे भूमिअभिन्यास तयार करुन त्यांचे निर्गतीबाबत जिल्हाधिकारी यांना सल्ला देणे.
• जमिनीच्या विकास नियंत्रणाच्या संबंधाने नगरपरिषदा, तसेच शासनाच्या महसूल व इतर विभागांना सल्ला देणे.
• जमीन मूल्यांकन व भूसंपादन कामात मूल्यांकन तज्ज्ञ म्हणून काम करणे.
• जिल्हा सत्र न्यायालयात सरकारी वकिलांना मूल्यांकनाबाबत साहाय्य् करणे.
• नगरपरिषद हद्दीतील मिळकतींच्या करआकारणी कामी प्राधिकृत मूल्यांकन अधिकारी म्हणून काम करणे.
• मुद्रांक शुल्क वसुलीसाठी वार्षिक बाजार मूल्यदर तक्ते तयार करणे.
• सहजिल्हानिबंधक यांना महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम, कलम 31, 32, 34 व 53 अन्वयेच्या प्रकरणांमध्ये मूल्यांकनासाठी सहाय करणे.